राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शुक्रवारी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झाले.

संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरिभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर सोंथालिया यावेळी उपस्थित होते.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात खासदारांनी केलेली कामे, अधिवेशन काळात उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रश्न मांडतानाचा प्रभावीपणा या आणि अशा विविध मुद्दय़ांवर आधारित फेम इंडिया आणि आशिया पोस्ट या दोन संस्थांनी सर्वेक्षण केले होते. त्यातून देशभरातील २५ खासदारांची निवड करण्यात आली आहे. यात संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून अव्वल ठरलेल्या सुप्रिया सुळे यांना प्रथम क्रमांकाचा नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला.

माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या  जनतेचा आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.