पिंपरी-चिंचवडला चौथा क्रमांक

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : देशातील ‘वास्तव्यास सर्वोत्तम शहरे’ जाहीर करताना या प्रक्रियेला बळकटी देण्याबरोबरच या प्रक्रियेची व्याप्ती वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या महापालिका स्तरावरील सर्वेक्षणात पुण्याचा पाचवा क्रमांक (५८.७९ गुण) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड महापालिके ने चौथा क्रमांक (५९ गुण) मिळविला आहे.

देशातील वास्तव्यास सर्वोत्तम शहरे जाहीर करतानाच महापालिके च्या स्तरावर स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात आले होते. महापालिके कडून करण्यात आलेली कामांच्या आधारे काही निकष निश्चित करण्यात आले होते. यामध्ये वीस प्रमुख घटकांचा आणि निर्देशांकाचा समावेश करण्यात आला होता.

शिक्षण, आरोग्य, पाणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता, नोंदणी आणि परवानगी, पायाभूत सुविधा, महसूल व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, वित्तीय जबाबदाऱ्या, वित्तीय विके ंद्रीकरण, ई-गव्‍‌र्हनन्स, डिजिटल साक्षरता, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूरक योजना, पारदर्शकता, उत्तरदायित्व, लोकसहभागाबरोबरच मनुष्य संसधान आणि प्रभावीपणा अशा पूरक निकषांचा समावेश होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापनामध्ये इंदूर महापालिका पहिल्या स्थानावर आहे. पिंपरी-चिंचवड चौथ्या तर पुणे महापालिका पाचव्या स्थानावर आहे. वास्तव्यास सर्वोत्तम शहर, आनंददायी शहर असा लौकिक शहराला प्राप्त झाला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक स्तरावर सुधारणा करण्यास वाव असल्याचे या निमित्ताने स्पष्ष्ट झाले आहे.

पुणे शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र अंमलबजावणीच्या पातळीवर योजना कागदावरच राहिल्या असल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, लोकसह

भागाबरोबरच प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर, ऑनलाइन सुविधा अशा बाबींवर भर देण्यात येत असल्याचा दावा महापालिके कडून के ला जातो. मात्र कामगिरी मूल्यमापन निर्देशांकानुसार महापालिके चा दावा फोल ठरला आहे.

देशातील वास्तव्यास सर्वोत्तम शहरांची यादी के ंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये दहा लाखांपेक्षा

अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पुणे देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पिंपरी-चिंचवड सोळाव्या स्थानी आहे. मात्र महापालिका कामगिरी मूल्यमापन निर्देशांकात पिंपरी-चिंचवड पुण्यापेक्षा सरस ठरले असल्याचे के ंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर के लेल्या यादीतून स्पष्ट झाले आहे. देशात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकांचे मूल्यमापन करण्यात आले आहे.