News Flash

पूर्णपणे यांत्रिक व्हेंटिलेटरची नवी संगणकीय रचना विकसित

८४ वर्षे वय असलेल्या कॅप्टन भरुचा यांना व्हेंटिलेटर तयार करण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

आयसर, आयुकासह विविध संस्थांतील शास्त्रज्ञांची निर्मिती

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था (आयसर) आणि आंतरविद्यापीठ खगोल भौतिकी के ंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञांनी अन्य काही संस्थांच्या मदतीने पूर्णपणे यांत्रिक व्हेंटिलेटरची संगणकीय रचना तयार के ली आहे. ‘भरुचा व्हेंटिलेटर’ या नावाने ही प्रसिद्ध रचना गेली काही वर्षे रुग्णालयांमध्ये वापरात असून, व्हेंटिलेटरच्या स्थानिक स्तरावरील निर्मितीसाठी नवी संगणकीय रचना खुली करण्यात आली आहे. हा व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी ७ हजारांपेक्षा कमी खर्च येतो.

आयसर आणि आयुकासह कॅ प्टन (नि.) रुस्तम भरुचा (भरुचा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, पुणे), ओपनब्रेद टेक, इंडोजिनियस आणि लंडनच्या किं ग्ज कॉलेजच्या शास्त्रज्ञांचा या प्रकल्पात सहभाग आहे. करोना संसर्गाच्या रुग्णांसाठी जगभर व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. त्यातच व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर निर्बंध आहेत. त्यामुळे उपयुक्तता सिद्ध झालेले, प्रत्यक्ष रुग्णालयांत वापरले जाणारे, मर्यादित साधनांमध्ये स्थानिक पातळीवर तयार करता येणाऱ्या व्हेंटिलेटरची गरज आहे. एमआयटीमधून दशकभरापूर्वी विकसित करण्यात आलेले ई-व्हेन्ट हे अँब्यु बॅग कॉम्प्रेशन डिव्हाइसेस (एबीसीडी) सध्याच्या निकडीच्या काळात उपयोगाला येत आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेले अद्ययावत व्हेंटिलेटर सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत मोठय़ा प्रमाणात निर्माण करणे केवळ अशक्य आहे.

कमी साधनांमध्ये आणि सहजरीत्या बनवता येणाऱ्या व्हेंटिलेटरचा शोध घेताना ओपनब्रेद टेक आणि इतर संस्थांना कॅप्टन (निवृत्त) रुस्तम के. भरुचा यांनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरची माहिती मिळाली. ८४ वर्षे वय असलेल्या कॅप्टन भरुचा यांना व्हेंटिलेटर तयार करण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आयसर पुणेच्या आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयातील डॉ. नरेश शर्मा यांच्या पुढाकाराने आयसर पुणेमधील शास्त्रज्ञ डॉ. उमाकांत रापोळ, डॉ. सुनील नायर, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील डॉ. प्रशांत झा, ओपन ब्रेद टेक आणि इंडो जिनियसचे सह संस्थापक निक बुकर यांच्यासह आयुकातील डॉ. सुरेश दोरावरी आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून कॅ प्टन भरूचा यांच्या व्हेंटिलेटरची संगणकीय रचना तयार करण्यात आली.

व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठीचे आवश्यक भाग स्थानिक बाजारपेठेतून खरेदी के ल्यास के वळ सात हजारात व्हेंटिलेटर तयार होऊ शकतो. मोठय़ा प्रामणात उत्पादन के ल्यास त्याची किं मत साडेतीन हजारांपर्यंत कमी होऊ शकते. करोना संसर्गावरील उपचारांसाठी उपलब्ध व्हेंटिलेटरमध्ये भरुचा व्हेंटिलेटर सर्वात किफायतशीर व्हेंटिलेटरपैकी एक आहे.

भरुचा व्हेंटिलेटरची खासियत

कॅप्टन भरुचा यांनी विकसित केलेले व्हेंटिलेटर ग्रामीण भागातील रुग्णालयांत प्रत्यक्ष वापरात आहेत. आजही सुमारे शंभर डॉक्टर आणि शेकडो रुग्ण या व्हेंटिलेटरचा लाभ घेत आहेत. वीज गेल्यानंतर डॉक्टर स्वत:च्या हाताने व्हेंटिलेटर चालवू शकतात. या व्हेंटिलेटरसाठी दाबयुक्त नळीच्या ऑक्सिजन किंवा हवेचीही आवश्यकता नाही. भरुचा व्हेंटिलेटर मजबूत असून, बनवण्यासाठी ते तुलनेने सोपे आणि पूर्णपणे यांत्रिक आहेत. यात कोणत्याही इलेक्ट्रॉनिकचा समावेश करण्यात आलेला नाही. आजच्या घडीला अशाच प्रकारच्या व्हेंटिलेटरची गरज आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या, जगाची अर्धी लोकसंख्या असणाऱ्या देशांसाठी मर्यादित साधनांमध्ये तयार होऊ शकणारे हे व्हेंटिलेटर अत्यंत उपयुक्त ठरतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 1:32 am

Web Title: new computerized system developed for fully mechanical ventilators zws 70
Next Stories
1 ‘मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत’
2 कोणासाठी कोणता मास्क उपयुक्त?
3 भुसार बाजार उद्यापासून बंद; खरेदीसाठी गर्दी
Just Now!
X