पुण्यात उद्यापासून म्हणजेच २४ जुलैपासून लॉकडाउन नसणार आहे. असं असलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या कोविड १९ च्या नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. महानगर पालिकेा हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.

आणखी काय काय म्हटलं आहे आदेशात?
प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, चाळ, वसाह, इमारत किवा गृहनिर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

कटेंन्मेंट झोनसाठी अटी
महापालिकेच्या हद्दीत वैद्यकीय, आपात्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासठी या सेवा वगळता आणि पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास मनाई

प्रतिबंधित क्षेत्रात दूध आणि भाजीपाला तसंच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे की स्वयंपाकाला गॅस, औषध विक्रीची दुकानं, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालय, व्यक्ती आणि त्यांच्या वाहनांना यातून वगळ्यात येतं आहे.

मनपाची अत्यावश्यक सेवा देणारी वाहनं म्हणजेच पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा गाडी व त्यावरचे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्रात कधीही प्रवेश करता येईल.

पुणेकरांना कशाची मुभा असेल

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल. मात्र जीम बंद राहतील.
व्यायामासाठी

सकाळी ५ ते ७ व्यायाम करता येणार .. लगान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही , व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)

दुकाने पी१ पी२ प्रमाणे सुरू राहतील

खासगी कार्यालये १० टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील

हाॅटेल्स रेसिटाॅरंट माॅल्स जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार

हाॅकर्सना व्यवसाय सुरू करता येणार

पार्सल, कुरियर सुरू

घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , जेष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)

सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक

जेष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही