मौलिक ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशित करण्याच्या निर्णयाची वर्षभरानंतरही विद्यापीठाकडून अंमलबजावणी नाही

पुणे : अभ्यासकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणि सध्या अनुपलब्ध असलेली मौलिक ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशित करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वर्षभरापूर्वी घेतला होता. मात्र, त्यानंतर वर्षभरात या ग्रंथसंपदेच्या विक्रीचे धोरण विद्यापीठाने ठरवले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुर्मीळ ग्रंथांच्या पुनप्र्रकाशनाचा हा प्रकल्प लालफितीत अडकला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाने विविध विषयांवरील अनेक जुने ग्रंथ, पुस्तके  प्रकाशित केले होते. त्यात भाषा, तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान अशा विविध ज्ञानशाखांतील मान्यवर अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथांचा समावेश आहे. पूर्वी हे ग्रंथ, पुस्तके  सर्वसामान्यांना, अभ्यासकांना उपलब्ध होती. मात्र आवृत्त्या संपल्यानंतर हे ग्रंथ, पुस्तके  पुन्हा प्रकाशित झाली नाहीत. मात्र, अभ्यासकांकडून या ग्रंथांविषयी विचारणा होत असल्याने ही ग्रंथसंपदा पुनप्र्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला. विद्यापीठाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रकाशन विभागातर्फे  या ग्रंथसंपदेचे पुनप्र्रकाशन करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर के ले होते. पुनप्र्रकाशित होणाऱ्या ग्रंथांमध्ये ‘महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती’, ‘प्राचीन मराठी लेख’, ‘रविकिरणमंडळ गौरविका’, ‘पोर्तुगीज-मराठे संबंध’, ‘मराठी नाटय़समीक्षा’,  ‘पुणे विद्यापीठाचा इतिहास’, न. चिं. केळकर व्याख्यानमाला, इतिहास अभ्यासक त्र्यं. शं. शेजवलकर, संस्कृतचे अभ्यासक रा. ना. दांडेकर यांची संस्कृतविषयक पुस्तके अशा ३५ ग्रंथांचा त्यात समावेश होता. प्रत्यक्षात, गेल्या वर्षभरात विद्यापीठाकडून या ग्रंथांच्या विक्रीचे धोरणच ठरवण्यात आले नसल्याने अद्याप हा प्रकल्प मार्गी लागला नसल्याचे समोर आले आहे. पुनप्र्रकाशित के लेल्या पुस्तकांची विक्री कशी करायची, विक्रीसाठी स्वतंत्र दालन असावे की पुस्तकांच्या विषयानुसार शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विक्री करायची असे प्रश्न आहेत. तसेच आर्थिक व्यवहार रोखीने न करण्याचे विद्यापीठाचे धोरण असल्याने पुस्तकांची रक्कम ऑनलाइन स्वीकारायची झाल्यास त्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यापीठाने काही पुस्तके  पुनप्र्रकाशित करूनही के वळ विक्री धोरणाअभावी पडून आहेत.

दुर्मीळ ग्रंथांचे पुनप्र्रकाशन सुरू झाले आहे. जवळपास ४५ ग्रंथ पुनर्मुद्रित करून तयार आहेत. आता या ग्रंथांच्या विक्रीसाठी लवकरच स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. 

– डॉ. नितीन करमळकर, कु लगुरू, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ