गिरिस्थान प्रकल्पासाठी खासगी धरण बांधण्यास जलसंपदा विभागाची मान्यता

पुणे : लवासा आणि अ‍ॅम्बी व्हॅलीपाठोपाठ मुळशी परिसरातील एका गिरिस्थान प्रकल्पासाठी खासगी धरण बांधण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. कुंडलिका नदी खोऱ्यात मुंबईतील एका खासगी कंपनीकडून हा गिरिस्थान विकास प्रकल्प उभारला जात असून त्यासाठी तीन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागाचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती

मुळशी परिसरातील लवासा आणि अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्पांची उभारणी आणि या गिरिस्थान प्रकल्पांसाठी होत असलेल्या पाण्याच्या वापरावरून मोठा गदारोळ झाला होता.

त्यानंतर पुन्हा एका खासगी कंपनीकडून मुळशी तालुक्यातच कुंडलिका नदीखोऱ्यातील गिरिस्थान प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आला होता. ५ हजार ९१४ एकर जागेवर हा गिरिस्थान प्रकल्प असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही त्याला मान्यता दिली होती.

त्यानंतर कोकण एकात्मिक जलआराखडय़ात या गिरिस्थान प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पासाठी तीन दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी वापरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे होता.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसिमितीनेही या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने खासगी कंपनीला स्वखर्चाने खासगी धरण बांधण्यास आणि बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

त्याबाबतचा अध्यादेश जलसंपदा विभागाकडून नुकताच काढण्यात आला आहे.

पाणी मुरतंय?

कृष्णा खोरे पाणीतंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्रात नव्याने धरण बांधण्यास मान्यता नाही. धरण उभारणीचा कोटा संपल्याचा दावा लवादाकडून करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही खासगी धरण बांधण्यास जलसंपदा विभागाने कशी मान्यता दिली, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

मात्र मुळशी तालुक्यात हा प्रकल्प असला तरी कुंडलिका नदी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येते. या धरणातील पाण्याचा पुणे किंवा अन्य शहरांसाठी वापर होत नाही. नदीचे पाणी कोकणात जाते. लवादाच्या निर्णयानुसार पश्चिम महाराष्ट्रात धरण बांधण्यास मान्यता नाही. पण कोकण खोऱ्यातील नद्यांवर धरण उभारणीस कोणतीही अडचण नाही, असा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.