News Flash

खासदार काकडे यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

न्यू कोपरे गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना सदनिका देण्याबाबत सन २००१ मध्ये करार झाला होता.

Sanjay Kakade: खासदार संजय काकडे यांनीही निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने कार्यक्रमाला न जाणे पसंत केल्याचे दिसते.

न्यू कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्प

न्यू कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मुदतीत सदानिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिले.

न्यू कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मुदतीत सदनिके चा ताबा न दिल्याप्रकरणी संजय काकडे, त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे, अशोक यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे वारजे आदेश पोलिसांना न्यायालयाकडून देण्यात आले. या प्रकरणी प्रकल्पग्रस्त दिलीप मोरे (रा. शिवणे) यांनी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाकडून काकडे यांच्यासह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, अशी माहिती न्यू कोपरे गावठाण प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अ‍ॅड. सुरेखा वाडकर यांनी दिली.  न्यू कोपरे गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना सदनिका देण्याबाबत सन २००१ मध्ये करार झाला होता. तीन वर्षांत त्यांना सदनिका देण्याचे मान्य करण्यात आले होते. न्यू कोपरे गावठाणातील ४०१ जणांपैकी ८७ जणांना सदनिका मिळाल्या नाहीत. पहिले पुनर्वसन नंतर विकसन ही अट घालून देण्यात आली होती. मात्र, काकडे यांच्याकडून करारातील अटींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे गेली सतरा वर्ष ८७ जण घरापासून वंचित राहिले. काकडे यांनी व्यावसायिकीकरणाला प्राधान्य दिल्याचे मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आम्हाला भाडे देखील देण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:57 am

Web Title: order to file a complaint against sanjay kakade kakade construction company
Next Stories
1 बंद सहकारी साखर कारखाने शासन घेणार
2 हिंजवडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
3 घराबाहेर पडू न शकणाऱ्यांचा ‘आधार’साठी विचारही नाही!
Just Now!
X