News Flash

पिंपरी-चिंचवड : मध्यरात्री निर्माण झाली ऑक्सिजनची टंचाई; अधिकारी, पोलिसांनी अशाप्रकारे वाचवले अनेकांचे प्राण

वायसीयम, जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो क्लस्टर येथे २४ तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा

प्रातिनिधिक फोटो

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विदारक चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात २४ तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा आहे. तर, शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही परिस्थिती फार चिंताजनक आहे. मध्यरात्री अचानक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पोलिसांनी धावाधाव करत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवला आहे. अजून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना ढाकणे यांनी दिलीय. दरम्यान, महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील हे स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात बसून आहेत. त्यांनी बैठक घेऊन संबंधित परिस्थितीवर तोडगा काढाण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

विभागीय आयुक्त कार्यलयात स्वतः आयुक्त राजेश पाटील हे पहाटे पर्यंत बसून होते. ऑक्सिजन बाबत महानगर पालिकेची टीम देखील रात्रभर काम करते आहे. शहरातील महानगर पालिकेच्या ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटर आणि वायसीयम रुग्णालयात २४ तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी दिली आहे.

महानगर पालिकेच्या पथकाकडून खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. ऑक्सिजनचा सुरळती पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे ढाकणे यांनी सांगितलं आहे. ढाकणे आणि त्यांची टीम सकाळपर्यंत ऑक्सिजन वितरण करण्याच काम करत होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील या कामात चांगली मदत केली असं त्यांनी सांगितलं. चाकण आणि इतर जिल्ह्याला जाणारा साठा इकडे वळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. बरीच कसरत करत रात्रभर ऑक्सिजन पुरठवा केला.

खासगी रुग्णालयांना महानगर पालिकेकडून ऑक्सिजन पुरवठा!

खासगी रुग्णालयांमध्ये छोटे गॅस पुरवठाधारक आहेत. त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून ऑक्सिजनचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. रात्रीची परिस्थिती विदारक होती. २-३ तासात ऑक्सिजन संपेल एवढाच साठा खासगी रुग्णालयाकडे शिल्लक होता. मात्र, महानगर पालिकेच्या प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत ऑक्सिजन पुरवला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 9:24 am

Web Title: oxygen shortage in pimpri chinchwad kjp 91 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणेकरांच्या मनात करोनाचं टेन्शन; कंट्रोल रुमकडे दिवसाला १०,००० फोन
2 रस्ता रुंदीकरण प्रक्रिया तूर्त ठप्प
3 आदेशापूर्वीच किराणा दुकाने बंद
Just Now!
X