25 September 2020

News Flash

विजेची अतिरिक्त सुरक्षा ठेवही ‘ऑनलाइन’ भरण्याची सुविधा

वीजबिलाप्रमाणेच अतिरिक्त सुरक्षा ठेवही आता ‘ऑनलाइन’ द्वारे भरण्याची सुविधा ‘महावितरण’ने दिली आहे.

| October 1, 2013 02:38 am

‘महावितरण’च्या वतीने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींची स्वतंत्र बिले देण्यात आली आहेत. या बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांना सध्या नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. सुरक्षा ठेवींचा भरणा करणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने ‘आॉनलाइन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी ‘महावितरण’च्या  www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुरक्षा ठेवींच्या थकबाकीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ‘मेक पेमेंट’ या रकान्यात ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ हा पर्याय घेतल्यास माहिती उपलब्ध होण्याबरोबरच रकमेचा भरणाही करता येणार आहे.
अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या भरण्यासाठी सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातही व्यवस्था करण्यात आली आहे. वीजग्राहकांना देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये ग्राहकाचे नाव, ग्राहक, उपविभाग व पीसी क्रमांकही देण्यात आला आहे. त्याआधारे कोणत्याही वीजबिल भरणा केंद्रामध्ये रकमेचा भरणा करता येणार आहे. सुरक्षा ठेव भरण्याची सुविधा एटीपी मशिनवर सध्या उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रात रकमेचा भरणा करावा लागेल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:38 am

Web Title: pay additional safty deposit for mseb by online
टॅग Online
Next Stories
1 नयना पुजारी खून खटला वेगाने चालविण्याचे न्यायालयाचे आदेश
2 कासारवाडीत ८३ लाखांचा डल्ला; चोरांचा सुळसुळाट कायम
3 अमूर्त शैलीचे प्रसिद्ध चित्रकार विजय शिंदे यांचे निधन
Just Now!
X