पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. परंतू, पाच दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर शहरात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, उद्या रविवारी शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी तसेच चिकन-मटण आणि मासे विक्रीची दुकानं सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ दुपारी १२ वाजेपर्यंतच निश्चित करण्यात आली होती.

सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांच्या कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले. मात्र, पाच दिवसानंतर नियम शिथिल करण्यात येणार होते हे अगोदरच पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी तसेच चिकन-मटण आणि मासे विक्रीची दुकानं सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत खुली राहणार होती. मात्र, संभाव्य गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता केवळ उद्या (रविवार) पुरता या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केली जाणारी दुकाने खुली राहणार आहेत. तरी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

लॉकडाऊनमध्ये उद्यापासून शिथिलता; काय सुरू राहणार

  • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी , चिकन-मटण, मासे विक्रीची दुकानं केवळ उद्या रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यानंतर २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत खुली राहणार आहेत.
  • मोंढा, मंडई, आडत भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे सर्व उद्यापासून १९ जुलै (रविवार) ते २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत सुरू राहणार आहे.
  • मटण, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री २० जुलै ते २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत सुरू राहणार.

गेल्या पाच दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने, आठवडी बाजार, चिकन, मटणची दुकानं बंद होती.