24 January 2019

News Flash

पिंपरीत अल्पवयीन मुलांकडून २५ वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पिंपरीच्या खराळवाडीत किरकोळ कारणावरून २० ते २५ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पिंपरीच्या खराळवाडीत किरकोळ कारणावरून २० ते २५ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पिंपरीच्या खराळवाडीत किरकोळ कारणावरून २० ते २५ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी २० अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सर्व मुलं हे १३ ते १५ वयोगटातील आहेत. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला होता. त्यावरून दोघांत अरेरावी झाली. ज्या मुलाला धक्का लागला त्याने २० जणांच्या टोळक्याला बोलावून घेतले आणि जे वाहन दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या तोडफोडीत २० ते २५ वाहनांची काचा फोडण्यात आल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून २० अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या आधीही अनेक वेळा पिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

First Published on April 15, 2018 3:46 pm

Web Title: pimpri minor childeren breakage of 25 vehicles