News Flash

लोणावळा : भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकलेल्या तरुणांना वाचवण्यात यश

लोणावळा शहर पोलिसांनी जीवाची बाजी लावत वाचवले प्राण

लोणावळा येथील भुशी धरण या ठिकाणी काही तरुण पर्यटनासाठी आले. मात्र ते पाण्याच्या प्रवाहात अडकून बसले होते. त्यामुळे भीतीने त्यांची गाळण उडाली होती. या सगळ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात लोणावळा पोलिसांना यश आलं आहे.  ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे. पावसाळा आला की पर्यटकांचे पाय भुशी धरणाकडे वळतात. मात्र पर्यटकांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असून आज भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिसरातील नद्या नाल्या एक झाल्या आहेत. भुशी धरण हे सर्वांचे आवडीचे पर्यटनस्थळ असून त्यात चिंब भिजण्याचा आनंद अनेक नागरिक घेतात. शुक्रवारी काही हौशी पर्यटक हे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेत होते. तेवढ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हे तरुण भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकले.  या तरुणांना वाचवण्यासाठी स्थानिक आणि पोलिसांकडे याचना करत होते. तेव्हा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आर.व्ही.मुंडे, आणि पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी आपला जीव धोक्यात घालून तरुणांना वाचविण्यात यश आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:02 pm

Web Title: police rescued youths who stuck in bhushi dam lonavala scj 81
Next Stories
1 पिंपरीमध्ये कोसळधार, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी
2 नगर रस्त्यावरील कोंडी फुटली
3 चित्रकारांनी लिहिते झाले पाहिजे
Just Now!
X