पोलिसांचा गणेशोत्सव बंदोबस्तात; घरातील गणपतीच्या आराधनेसाठी वेळच नाही

पुणे शहरातील गणेशोत्सव म्हणजे एक आनंदयात्रा. दहा दिवस चैतन्याने भारावलेल्या या उत्सवात राज्याच्या विविध भागांतून भाविक हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. एवढेच नव्हे, तर परराज्य आणि परदेशातूनही भाविक खास गणेशोत्सवासाठी पुण्यात येतात. पुण्याच्या प्रत्येक घरात, रस्त्यात, चौकात विघ्नहर्त्यांने वातावरण भारलेलं असतं. पण अशा या भक्तीमय वातावरणातही सर्व इच्छा, भावना, अपेक्षांना बाजूला सारत पुणे पोलीस बंदोबस्तात व्यग्र असतात. गणेशोत्सवाचा बंदोबस्त म्हणजे पुणे पोलिसांसमोर एक आव्हान असते. कुरबुरी, कार्यकर्त्यांमधील वाद, हाणामाऱ्या, चेंगराचेंगरी, दागिने चोरी अशा घटनाही या काळात घडतात. त्यामुळे क्वचितच या पोलिसांना आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशाची मनोभावे आराधना करण्याची संधी मिळते. अर्थात, सलग दहा ते बारा दिवसांच्या अहोरात्र बंदोबस्तानंतर उत्सव शांततेत पार पडल्याचे समाधान त्यांच्यासाठी भरपूर असते.

श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेपासून सुरू होणाऱ्या अहोरात्र बंदोबस्ताची सांगता अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी होते. या कोळात पोलिसांना घरचा उत्सव साजरा करुन बंदोबस्तावर यावे लागते. उत्सवाच्या कोलावधीत महिला पोलिसांची मोठीच धावपळ उडते. अगदी पहाटे पाचपासून घरची कोमे उरकून महिला पोलिसांना सकोळी नऊ वाजता दिलेल्या ठिकोणी बंदोबस्तासाठी हजर राहावे लागते. शहराच्या मध्य भागात मानाच्या

मंडळांसह रोषणाईसाठी प्रसिद्ध असलेली अनेक मंडळे आहेत. उत्सवाच्या कोलावधीत या भागात अहोरात्र गर्दी असते. त्यामुळे सर्वाधिक ताण मध्यभागातील फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांवर असतो. उत्सवाच्या कोलावधीत अनेक केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांची या उत्सवात उपस्थिती असते. त्याचेही नियोजन पोलिसांना करावे लागते. यंदाच्या उत्सवात पुणे पोलीस दलातील आठ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला,सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पाचशे होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची मदत घेतली जाणार आहे. यंदाच्या वर्षी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ ) पाच तुकडय़ा शहरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गौरी विसर्जनानंतर बंदोबस्ताचा ताण वाढतो.

या कोळात उच्चांकी गर्दी होते. यंदाही पोलिसांपुढे बंदोबस्ताचे आव्हान आहे. गेला महिनाभर पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी के ली असून नियोजन आणि शिस्तीच्या बळावर यंदाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास पोलिसांना आहे.

महत्त्वाच्या मंडळांच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस अधिकोऱ्यांना वाटून देण्यात आली आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मध्यभागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकोंसाठी यंदाही एके री पादचारी मार्ग योजना राबविण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कोरवाया विचारात घेऊन साध्या वेशातील पोलीस संशयितांवर नजर ठेवणार आहेत. बंदोबस्तात एखादा पोलीस आजारी पडला तर तातडीने वैद्यकीय उपचार क रण्यासाठी खास दवाखाना सुरू क रण्यात आला आहे.

– हेमंत भट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक