15 July 2020

News Flash

महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याची तयारी

विद्यापीठाच्या परिपत्रकाबाबत प्रश्न

विद्यापीठाच्या परिपत्रकाबाबत प्रश्न

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवे शैक्षणिक वर्ष १सप्टेंबरपासून आणि यापूर्वीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू करण्याचे निर्देश दिलेले असताना सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याचे निश्चित के ले आहे. मात्र करोना संसर्गाच्या काळात १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू कसे करणार, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

विद्यापीठाकडून १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांचे परिपत्रक संके तस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुरचना, औषधनिर्माण यांचे पदवी अभ्यासक्रम १५ जून, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम १ जुलैपासून सुरू होणार आहे. मानव्यविज्ञान विद्याशाखेतील कला, सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम १५ जून, तर विधी अभ्यासक्रम १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून, तर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार, विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा होणार की नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना विद्यापीठाने मात्र नव्या शैक्षणिक वर्षांची तयारी के ली आहे. करोना संसर्गामुळे प्रवास, घरातून बाहेर पडण्यावरही र्निबध असताना नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरू करायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्षांची सुरुवात म्हणजे प्रशासकीय कामकाज १५ जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यात नॅक मूल्यमापन, समुपदेशन, विविध अहवाल-माहिती संकलित करून पाठवणे, संलग्नता, प्रवेश परीक्षांची तयारी आदी अनेक कामे असतात. त्यांचा प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंध नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून शक्य नाही.

– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संलग्न महाविद्यालयांशी तफावत का?

संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून, तर विद्यापीठातील शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र, संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभाग यांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत तफावत का, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:48 am

Web Title: preparing to start the academic year of colleges from 15th june zws 70
Next Stories
1 उड्डाण पूलावरून तळ्यातमळ्यात
2 संचारबंदीचा आदेश भंग प्रकरणातील जप्त वाहने परत मिळण्याचा मार्ग मोकळा
3 गायिका बेला शेंडे यांच्याशी शुक्रवारी संगीत-संवाद
Just Now!
X