News Flash

JNU हिंसाचार: पुण्यात मोदी-शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी

मुंबई आणि पुण्यातही जेएनयूमधल्या घटनेचे पडसाद उमटले

जेएनयू प्रकरणाचे पडसाद पुण्यातही उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात या ठिकाणी घोषणा देण्यात आली. पुणे विद्यापीठातील अनिकेत कॅन्टिनजवळ JNU मधील मारहाणीचा निषेध नोंदवत सुमारे दोन तास विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि विद्यापीठातील विविध संघटना सहभागी झाल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU ) संकुलात रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनात रविवारी काही विद्यार्थी जखमी झाले. जेएनयूची अध्यक्ष आइशी घोषने या प्रकरणी तातडीने चौकशी सुरु करण्याची मागणी केली. तसेच आमच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता असाही आरोप केला. मी स्वतः पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी हे आश्वस्त केलं होतं की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. तरीही ७० च्या आसपास लोक इथे आले आणि त्यांनी आम्हाला रॉडने मारण्यास सुरुवात केली. दरम्यान याच सगळ्या घटनेचे पडसाद मुंबई आणि पुण्यातही उमटले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 10:11 pm

Web Title: protest in pune for jnu support and against pm modi scj 81
Next Stories
1 लग्नानंतर मूल जन्माला घालण्याचा आग्रह सोडला पाहिजे-अतुल कुलकर्णी
2 काका पवारांच्या तालमीतीले दोन मल्ल ‘महाराष्ट्र केसरी किताबा’साठी आमनेसामने
3 JNU Violence : हे केंद्र सरकारचे अपयश : सुप्रिया सुळे
Just Now!
X