21 September 2020

News Flash

पुण्यात PUBG खेळताना तरूणाला झटका, उपचारादरम्यान मृत्यू

अतितणावामुळे मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पबजी (PUBG) गेम खेळत असताना २५ वर्षीय तरूणाला अचानक ह्दयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला आहे. हर्षल देविदास मेमाणे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. शुक्रवारी हर्षल मेमाणे हा २५ वर्षीय तरूण पबजी गेम खेळत होता. त्यावेळी अचानक त्याला ह्दयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. उपस्थितांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण आज, शनिवारी उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला आहे.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहणाऱ्या हर्षलचा पबजी गेम खेळत असताना तणावातून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी हर्षल हा नेहमीप्रमाणे घरात पबजी गेम खेळत होता. अचानक त्याला झटका आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने हर्षलला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटेच्या सुमारादरम्यान त्याचा उपचारसुरू असताना मृत्यू झाला.

हर्षल गेल्या काही वर्षांपासून काहीच काम करत नव्हता. पबजी गेम जास्त खेळल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:57 pm

Web Title: pubg 25 year boy dead in pimpri chinchawad nck 90
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा संसदेत नव्हे तर प्राणीसंग्रहालयात-उमर खालिद
2 साखर उद्योगातील अडचणींवर उपायमंथन
3 ‘हायपरलूप’ प्रकल्पाला महाविकास आघाडीचा खोडा?
Just Now!
X