News Flash

पुणे-आंबिल ओढाः वेळोवेळी नोटिसा देऊन आम्हीच केली कारवाई – पुणे महापालिकेनं केलं स्पष्ट

वर्तमानपत्र तसंच वैयक्तिकरित्याही नागरिकांना नोटिसा पाठवल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा दावा

पुणे-आंबिल ओढाः  वेळोवेळी नोटिसा देऊन आम्हीच केली कारवाई – पुणे महापालिकेनं केलं स्पष्ट
आंबिल ओढा परिसरात नागरिकांनी प्रचंड विरोध करुन, वारंवार हायकोर्टाच्या आदेशाची आठवण करुन देऊनही कारवाई सुरुच आहे

आंबिल ओढा परिसरात केलेली कारवाई ही सर्व नियम पाळून केलेली असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचं पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “यासंदर्भात पालिकेच्या आयुक्तांसोबतही तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या सर्व नागरिकांना हे माहित आहे की आपलं पुनर्वसन जवळचं २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये होणार आहे. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स पालिकेने दिलेले आहेत. उद्या नाल्याला पूर येऊन काही होऊ नये यासाठी सध्या हे काम करणं आवश्यक आहे”.

महानगरपालिकेकडून नाला सरळीकरणाचं काम सुरु असल्याने त्यासाठी कारवाई करण्यात आल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.

जाणून घ्या काय आहे प्रकरणः पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

आपल्याला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळालेली नसून केवळ बिल्डरने आपल्याला नोटीस पाठवल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या नोटिसीची प्रतही नागरिकांनी दाखवली आहे.

केदार असोसिएट्सकडून पाठवण्यात आलेली नोटीस

हेही वाचा- पुणे-आंबिल ओढा कारवाई : हायकोर्टाचा आदेश धुडकावत कारवाई सुरु?

पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला होता. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता.

आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. तसंच ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 12:48 pm

Web Title: pune ambil odha demolition pmc officer said we have sent the prior notices vsk 98
Next Stories
1 पुणे-आंबिल ओढा कारवाई : हायकोर्टाचा आदेश धुडकावत कारवाई सुरु?
2 दुर्दैवी! पुण्यात ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू
3 पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Just Now!
X