News Flash

पुण्याच्या मावळमध्ये फिल्मीस्टाईलने बालगुन्हेगाराची हत्या; थरार सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्हीत कैद झालेत.

पुण्याच्या मावळ तालुक्यात अल्पवयीन गुन्हेगाराची फिल्मी स्टाईलने भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. रोशन हिंगे (१७) असं हत्या झालेल्या बालगुन्हेगाराचे नाव आहे. आज सकाळी चाकण तळेगाव रस्त्यावरील माळवाडीत ही घटना घडली. हल्लेखोर पाठलाग करताना सीसीटीव्हीत कैद झालेत. रोशन दुचाकीवरून निघाला असता,त्याला पाठीमागून ठोकर दिली आणि खाली पाडले. रोशन जीव वाचवण्यासाठी लोकवस्तीच्या दिशेने धावत होता. अखेर आरोपीने गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले,यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी संशयित आरोपी किशोर पानसरे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत रोशन हिंगे (१७) राहणारा इंदोरी मावळ,आणि त्याचा मित्र हा सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून चाकण तळेगाव मार्गावरून जात होते तर सहा आरोपी त्यांचा फिल्मी स्टाईलने मोटारीतून पाठलाग करत होते. माळवाडी येथे आल्यानंतर रोशनच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक देण्यात आली.त्यामुळे तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खाली पडले.

आरोपी मोटारीतून खाली उतरले आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. रोशन हा जीव वाचवण्यासाठी लोकवस्तीच्या दिशेने धावत होता.अखेर एकाच्या घरासमोर आल्यानंतर त्याला आरोपीने गाठले आणि त्याच्यावर सहा जणांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात रोशनचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे रोशन हा जी.टी.टोळीचा सदस्य आहे. याच टोळीने संशयित आरोपी किशोर पानसरे याच्या सख्ख्या भावाची हत्या केली होती, रोशन हा बालगुन्हेगार आहे. पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक विक्रांत पासलकर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 7:23 pm

Web Title: pune maval murder minor accused
टॅग : Maval
Next Stories
1 विमानात क्रू मेंबरची छेड काढणा-या पुणेकर आजोबांना अटक
2 पुणे : लपाछपी खेळताना चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
3 जाणून घ्या, काय आहेत शिवप्रतिष्ठानच्या मागण्या?
Just Now!
X