पुणे शहरात दिवसभरात २८२ करोना बाधित रुग्ण आढळले. दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या चार हजार ६७२ झाली आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या एक लाख ८१ हजार २४७ इतकी झाली आहे. 347 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख ७३ हजार ९२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 167 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 158 जण करोनामुक्त झाले आहेत. दिववसभरात पाच रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 97 हजार 790 वर पोहचली असून पैकी, 94 हजार 316 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 573 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने