विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (१५ सप्टेंबर) शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि महावितरणच्या वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना प्रमुख रस्त्यांचा वापर करण्यात येणार नाही. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) टप्प्याटप्प्याने प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जातील.

वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. मध्यभागातील नागरिकांची विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी गैरसोय होण्याची शक्यता आहे. विसर्जन मार्गावर वाहनचालकांनी त्यांची वाहने लावू नयेत. वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसेल, तर त्यांनी नदीपात्रात वाहने लावावीत.

त्यामुळे त्यांना विसर्जनाच्या दिवशी शहराच्या अन्य भागात जाण्यासाठी वाहनांचा वापर करणे शक्य होईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. विसर्जनाच्या दिवशी शहरात वाहतूक शाखेचे ९४० पोलीस नियोजन करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

विसर्जनाच्या दिवशी बंद राहणारे रस्ते

  • शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक)
  • लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते टिळक चौक)
  • बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद)
  • बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज)
  • कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कॉर्नर)
  • केळकर रस्ता (बुधवार चौक ते टिळक चौक)
  • गुरू नानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक)
  • गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक)
  • टिळक रस्ता (जेधे चौक ते अलका टॉकीज)
  • शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज)
  • जंगली महाराज रस्ता (झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक)
  • कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक)
  • फग्र्युसन रस्ता (फग्र्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार ते खंडोजीबाबा चौक)
  • भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक)
  • पुणे-सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक)
  • सोलापूर रस्ता (स्व. चिमणराव ढोले चौक ते जेधे चौक)
  • प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).

विसर्जनाच्या दिवशी वाहतूक वळविण्यात येणारी प्रमुख ठिकाणे

  • झाशी राणी चौक (जंगली महाराज रस्ता)
  • काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक (शिवाजी रस्ता)
  • अपोलो चित्रपटगृह (मुदलीयार रस्ता)
  • संत कबीर पोलीस चौकी (नेहरू रस्ता)
  • सातारा रस्ता (व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह)
  • सावरकर पुतळा चौक (बाजीराव रस्ता)
  • लालबहाद्दुर शास्त्री रस्ता(सेनादत्त पोलीस चौकी)
  • नळस्टॉप चौक (कर्वे रस्ता)
  • गोखले स्मारक चौक (फग्र्युसन रस्ता)
  • सोलापूर रस्ता (चिमणराव ढोले पाटील चौक)

वाहने लावण्याची ठिकाणे

  • एच.व्ही.देसाई महाविद्यालय, शनिवारवाडा
  • पुलाची वाडी, डेक्कन, नदीपात्र
  • पुरम चौक ते हॉटेल विश्व
  • दारुवाला पूल ते खडीचे मैदान, सोमवार पेठ
  • गाडगीळ पुतळा चौक ते कुंभार वेस,
  • काँग्रेस भवन
  • टिळक पुल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता.