खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरतर्फे (पीआरसी) संस्थेचा ४२वा ‘रेझिंग डे’ विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पीआरसीच्या खडकी येथील परिसरामध्ये जवानांसाठी व्हीलचेअर शर्यत, थ्रोबॉल, बास्केटबॉल अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मेरीएट सूट्स आणि कोर्टयार्ड मेरिएट यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली. शत्रूशी लढताना जायबंदी झालेल्या जवानांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे हा पीआरसीचा मुख्य उद्देश असून, ‘रेझिंग डे’च्या निमित्ताने या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.