भैरवनाथ साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द करा अशी मागणी करत खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली.
भैरवनाथ साखर कारखान्याने गेल्या वर्षी एफआरपी न देता यंदा गाळप परवाना घेतल्याने तो निलंबित करावा. अशी मागणी राजू शेट्टी यांनी पुण्यात आज साखर आयुक्तांकडे केली. तर यावेळी शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि राजू शेट्टी यांच्यात फोनवर बोलताना शाब्दिक वाद देखील झाला.  साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांची साखर संकुलात भेट घेऊन शेट्टी यांनी भेट घेऊन राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा देखील केली.

राज्यातील अनेक साखर कारखान्या यानी नियमानुसार एफआरपी दिली नाही. तरी देखील अनेक कारखान्याचे गाळप सुरू आहे. अशांवर कारवाई झाली पाहिजे. जोवर गाळप परवाना निलंबित होत नाही. तोवर साखर आयुक्त कार्यालयातून हलणार नाही. असा पावित्रा खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त समोर घेतला केले. तसेच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी एफआरपी थकली नसल्याचे  खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन गाळप परवाना मिळवला आहे.

अशा कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा गाळप परवाना रद्द झाला पाहिजे अशी मागणी साखर आयुक्तांकडे त्यांनी केली. त्याच दरम्यान शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि खासदार राजू शेट्टी यांचे फोन वर बोलणे झाले. यावेळी दोघांमध्ये फोनवर बोलतानाच वाद झाला. यानंतर राजू शेट्टी अधिक आक्रमक होत कार वाई ची मागणी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी न मिळाल्यास भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिली.