पुणे : उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात झपाट्याने बदल होत आहेत. कोकण विभागात अद्यापही पावसाळी स्थिती कायम असून, मुंबईसह इतरत्र दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढले असून, मराठवाडा आणि विदर्भात ते सरासरीच्या आसपास आहे.

कोकण विभागात काही ठिकाणी २२ फेब्रुवारीला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि परिसरात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी, तर दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५ अंशांनी वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

सांताक्रुझ केंद्रावर रविवारी राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.