जीएसटी कमी करा अशा मागण्या माझ्याकडे येत आहे. पण, जीएसटी कमी करण्याचे अधिकार माझ्या हातात नाही. असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. व्यापारी वर्गाला जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे ? असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कौन्सिलला आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातील सदस्य असतात. यासाठी एक प्रक्रिया असून त्यानंतरच यामध्ये बदल किंवा तो कमी करता येऊ शकतो. देशातील पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांसाठी जीएसटीच्या अंतिम मुदतीत देखील वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी देशातल्या उद्योगांबाबत भूमिका मांडतांना देशात छोट्या, मोठ्या, मायक्रो, मिनि आदी सर्व प्रकारच्या उद्योजकांना सोबत घेऊन जाणं ही आमची भूमिका असल्याचेही म्हटले.

या अगोदर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी त्यानंतर केंद्र सरकारवर आरोप करावेत, असे म्हणत टोला लगावला होता.