पुणे : प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे  (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.

nagpur matin bhosale marathi news, nagpur fasepardhi marathi news
फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव
how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना

डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे. तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.

कु लकर्णी यांना जातो. भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.  डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.   विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.