आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. याचप्रकारे दहावीच्या परिक्षेत ७४.६० टक्के गुण मिळवणाऱ्या राजनंदिनी पांडुरंग शिंदे या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय तीने केवळ आई-वडिलांना दिले आहे.

राजनंदिनीचे वडील पांडुरंग शिंदे हे खासगी कंपनीत कामाला असून त्यांना महिन्याला ७ ते ८ हजार रुपये पगार मिळतो. हे पैसे कुटुंबाला पुरत नाहीत म्हणून ते पहाटे उठून वसाहतीमधील गाड्या धुण्याचे कामही करतात. त्याचबरोबर मुलीच्या शिक्षणासाठी पैसे अपूरे पडू नयेत म्हणून ते पिंपळे गुरव ते शिवाजीनगर असा १५ किलोमीटर प्रवास सायकलवर करतात. त्याचबरोबर आई वंदना शिंदे या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक आणि धुण्या-भांड्यांची कामं करतात. त्यातून या कुटुंबाला महिन्याकाठी १० ते १२ हजार रुपये मिळतात. या पैशातून पुन्हा महिन्याला ४ हजार रुपये घर भाडं त्यांना भरावं लागतं. त्यानंतर उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलीचं शिक्षण.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

राजनंदिनी ही सांगवीतल्या नृसिंह कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. दहावीत ७४.६० टक्के गुण मिळवत तिने आई-वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरिबी परिस्थिती वाढलेली. मात्र, कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही, अगदी पुस्तकांसाठी देखील. आई-वडील जेवढं देतील तेवढ्यातच तीने आनंद मानला. हे घवघवीत यश मिळवताना तिनेही स्वतः मोठे कष्ट घेतले. त्यासाठी तिचा सकाळी सहा क्लासला जाण्यापासून अभ्यास सुरु व्हायचा त्यानंतर शाळा आणि पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत क्लास असा तिचा दिनक्रम होता.

आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत राजनंदिनीने दिवस रात्र अभ्यास करीत दहावीत चांगले गुण मिळवले. राजनंदिनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध आणि गरीबांसाठी काम करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे.