17 December 2017

News Flash

‘शिवछत्रपती महोत्सवा’ला पुण्यामध्ये सुरुवात

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे ‘शिवछत्रपती महोत्सवा’ला सुरुवात झाली असून, हा महोत्सव १९ फेब्रुवारीपर्यंत शिवाजीनगर

प्रतिनिधी, पुणे | Updated: February 17, 2013 1:10 AM

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे ‘शिवछत्रपती महोत्सवा’ला सुरुवात झाली असून, हा महोत्सव १९ फेब्रुवारीपर्यंत शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगणावर सुरू राहणार आहे.
या महोत्सवात शनिवारी शिवकालीन शस्त्रास्त्रे, किल्ल्यांची छायाचित्रे, ऐतिहासिक वस्त्र आणि कला प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रविवारी (१७ फेब्रुवारी) नोकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होतील. १८ फेब्रुवारी रोजी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मावळ्यांच्या वंशजांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते ‘जिजाऊ’ पुरस्कांचे वितरण होणार आहे. या वेळी युवराज छत्रपती संभाजी राजे उपस्थित असतील. १९ फेब्रुवारीला भव्य मिरवणुकीने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

First Published on February 17, 2013 1:10 am

Web Title: shiv chatrapati festival started in pune