पुणे : करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मोफत लसीकरणाची वाट न पाहता महापालिके ने थेट लस खरेदी करून सर्व नागरिकांचे लसीकरण करावे. त्यासाठी अनावश्यक विकासकामे थांबवून या निधीतून लस खरेदी करावी, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांच्याकडे के ली आहे.

शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकु डे आणि संजय मोरे, सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे आणि प्रशांत बधे यांनी त्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. पुणे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर ठरले आहे. त्यादृष्टीने महापालिका वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहे. मात्र या सर्व गोष्टी तात्पुरती मलमपट्टी के ल्यासारख्या आहेत. यावर लसीकरण प्रक्रिया पूर्ण करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी महापालिके ने थेट कं पन्यांकडून लस खरेदी करावी आणि शहरातील नागरिकांचे लसीकरण करणे उपयुक्त ठरणार आहे.

१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या २८ लाख एवढी आहे. विकासकामांपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. शासनाकडून मोफत लस मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा तत्काळ लस खरेदीसाठी अनावश्यक विकासकामे थांबविण्यात यावीत आणि या निधीतून लस खरेदी करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.