04 March 2021

News Flash

रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा

पुणे- नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेना आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर

संग्रहित छायाचित्र

खेडमध्ये रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान त्यांनी रिक्षेची तोडफोड केली होती.

पुणे- नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेना आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरले. हातात लाठ्या- काठ्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी रिक्षांची तोडफोड केली. वाहतूक कोंडीविरोधात कायदा हातात घेणाऱ्या आमदार गोरे यांच्यावर टीका होत होती. अखेर या प्रकरणी सोमवारी चाकण पोलिसांनी आमदार गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 10:23 am

Web Title: shivsena khed mla santosh gore booked for vandalizing rickshaw
Next Stories
1 शाळांना सीसीटीव्ही सक्ती!
2 पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी भूसंपादनाचे आदेश
3 आदिवासी बोलींच्या पुस्तकनिर्मितीचे शिवधनुष्य
Just Now!
X