पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १७६२ रुग्ण आढळले. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ५७ हजार ५२३ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर शहरात १ हजार ३६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १२०३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ३८ हजार ११७ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात ८७१ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ७९७ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ९३४ वर पोहचली असून यांपैकी १५ हजार ४७९ जण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ४४७ जणांचा मृत्यू झाला असून संबंधित आकडेवारी महापालिका हद्द आणि ग्रामीण भागातील आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ७०४ इतकी आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.