News Flash

धक्कादायक! पुण्यात करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयातील घटना

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून यावर उपचारांसाठी रुग्णालय किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या विनयभंगच्या घटनाही समोर येत आहेत. पुण्यात सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना आता हडपसरमध्ये सह्याद्री रुग्णालयातील करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. वडगावशेरी) या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. हडपसर भागातील सह्याद्री रूग्णालयात तो सेवेत असून याच रुग्णालयात एक ३५ वर्षीय महिला करोनावर उपचार घेत आहे. ही महिला एका खोलीमध्ये काल सायंकाळच्या सुमारास आराम करीत होती. तेव्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय अशोक गवळी त्या महिलेच्या खोलीत जाऊन, तिच्या चेहर्‍यावरील मास्क काढून तुम्ही मला ओळखता का? असं विचारत लज्जास्पद कृत्य केले.

तेवढ्यात रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपीला हटकले. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला आणि त्या खोलीतील घडलेला सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शी महिलेने रुग्णालय प्रशासनाला त्वरित कळवला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पीडित महिला घाबरून गेली होती. तिच्याशी रुग्णालय प्रशासनाकडून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास रूग्णालयामधील कर्मचारी आले. त्यानंतर घटनास्थळी पीडित महिलेच्या खोलीची महिला पोलीस कर्मचार्‍यांनी पीपीई किट घालून पाहणी केली. त्यानंतर महिलेचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपीला अटक करण्यात आली. तसेच आरोपीची करोना तपासणी देखील करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलिसांकडून सांगण्यात आले. तर या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील करीत आहे.

कोविड सेंटर्स आणि रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज

या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या, “राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या सुचनांवरुन कोविड सेंटर्स आणि रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. या सूचनांचे संबंधित रुग्णालयाने पालन करणे जरुरीचे आहे. दरम्यान, पुण्यातील सह्याद्री रूग्णालयात करोनाबाधित महिलेवर वॉर्डबॉयने केलेल्या कृत्याचा निषेध आहे. यातील आरोपीला जामीन मिळता कामा नये. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोविड सेंटर किंवा रूग्णालयात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. त्या माध्यामातून प्रत्येक मिनिटांचे निरीक्षण तेथील यंत्रणेने केले पाहिजे. आता येत्या काळात अधिकाधिक परिचारिकांची भरती करण्याची गरज असून वॉर्डबॉयना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 7:23 pm

Web Title: shocking wardboy molests corona patient woman in pune hospital aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेची भर रस्त्यात हत्या; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न
2 पिंपरी- चिंचवड : आठ कोटींच कर्ज काढून देतो असे सांगून, डॉक्टरला ४० लाखाला फसवले
3 दूध उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल, तर अनुदान द्या : चंद्रकांत पाटील
Just Now!
X