दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी फेरपरीक्षा जुलैमध्ये होणार असून, परीक्षेचे वेळापत्रक राज्य बोर्डाने जाहीर केले आहे. यंदा ९ जुलै ते १६ जुलैदरम्यान तोंडी परीक्षा होणार आहे, तर १८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात येईल. याशिवाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परीक्षा देखील लेखी परीक्षेच्या कालावधीतच घेतली जाणार आहे. या विषयीचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाने https://mahahsscboard.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या संकेतस्थळावरील सुविधा ही केवळ माहितीसाठी असून, विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी शाळांकडे पाठविण्यात येणाऱया छापील वेळापत्रकानुसार परीक्षेची तारीख आणि वेळेची माहिती करून घ्यावी लागणार आहे.