News Flash

खासगी विद्यापीठांतील प्रवेशांसाठीची ‘पेरा सीईटी’ १६ ते १८ जुलैदरम्यान

व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्य शासनाकडून सीईटी घेतली जाते.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन) या संघटनेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २०२१ यंदा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम मुदत असून, २३ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्य शासनाकडून सीईटी घेतली जाते. तसेच पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या पेरा सीईटी देता येईल. या प्रवेश परीक्षेमुळे खासगी विद्यापीठांतील प्रवेशांना गती मिळेल. परीक्षेबाबतची अधिक माहिती www.peraindia.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड आणि पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:51 am

Web Title: state private universities admissions through pera cet 2021 to begin on 16th july zws 70
Next Stories
1 मुदत संपली, रस्ते दुरुस्ती सुरूच
2 पर्यटन महामंडळाची पुणे विभागातील निवासस्थाने सुरू
3 टोमॅटोवर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव
Just Now!
X