01 March 2021

News Flash

फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद झेपत नाही !

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 

खासदार सुप्रिया सुळे यांची खोचक टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री सत्तेत आहेत हेच विसरतात. नळावर भांडणाऱ्या बायकांप्रमाणे भांडत असतात. त्यांना मुख्यमंत्रिपद झेपत नाही, अशा शब्दांत सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यासह माजी मंत्री मदन बाफना, बबनराव भेगडे, बाळासाहेब नेवाळे, बापू भेगडे, गणेश खांडगे, किशोर भेगडे आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांची भाषणे पाहिली की भीतीच वाटते. मुख्यमंत्री जोरजोरात ओरडून भाषण करतात. ते सत्तेत आहेत व मुख्यमंत्री आहेत हेच विसरतात आणि विरोधी पक्षात असल्यासारखे बोलतात. सत्ता असते त्याने काम करून घ्यायचे असते. हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्याचा पारा चढलेलाच असतो. नळावर बायका भांडतात, तसा ‘वसा वसा’ भांडत असतो. आजपर्यंत इतके मुख्यमंत्री पाहिले, इतका चिडका मुख्यमंत्री पाहिला नाही. मुख्यमंत्री को इतना गुस्सा क्यों आता है? असे त्यांना विचारावेसे वाटते. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तशी भीतीच वाटते, मात्र जेव्हा वेळ येईल, तेव्हा हेल्मेट घालून भेटायला जावे लागेल. नाहीतर काहीतरी फेकून मारतील की काय, असे वाटते, या शब्दांत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्रिपद हे मोठे पद आहे. महाराष्ट्रातील जनता अपेक्षेने त्यांच्याकडे पाहते आहे, मात्र फडणविसांना मुख्यमंत्रिपद झेपत नाही, असेही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 2:05 am

Web Title: supriya sule slam on devendra fadnavis
Next Stories
1 पुणे दिल्ली रेल्वेसेवा ‘हाऊसफुल्ल’
2 ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा आरोग्यासाठी तापदायक
3 नामवंतांचे बुकशेल्फ : पाखरांच्या शाळेतून वाचनाचा ध्यास
Just Now!
X