21 October 2020

News Flash

राज्यपाल म्हणतात, ‘‘दादा आपके राज्य में बिना इजाजत आया हू …’’

जाणून घ्या, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल कोश्यारी यांना काय म्हणाले...

“दादा आपको स्वतंत्रता दिन की बहुत बहुत शुभ कामानाए, आपके राज्य में बिना इजाजत आय हू…” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुण्यातील विधान भवन येथे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणच्या कार्यक्रमास आल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करत विनोदी शैलीत म्हटले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना नमस्कार करत हसून नहीं नहीं… असे म्हणून  राज्यपाल कोश्यारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत ध्वजारोहणासाठी नेले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नमस्कार करत, आपको भी स्वतंत्रता दिन की  बहुत बहुत  शुभ कामानाए.. असे म्हणत प्रतिसाद दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवन येथे  स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव,  खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी तसेच करोना योद्धे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:33 am

Web Title: the governor says dada i came to your state without permission msr 87 svk 88
Next Stories
1 नव्या दुचाकी नोंदणीचा वेग मंदावला
2 पुण्यात करोनामुळे २४ तासात २७ जणांचा तर पिंपरीत १३ जणांचा मृत्यू
3 एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा
Just Now!
X