टिक टॉक हे ऍप सध्या जगप्रसिद्ध झालं असून याचे लाखो युजर्स आहेत. परंतु, ते योग्य हाताळणे गरजेचं आहे. मनोरंजन आणि अवगत गुण दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याच ऍप मुळे पिंपरी-चिंचवड शहरात प्रेयसी आणि प्रियकराच्या वाद होऊन तो सायबर क्राईम यांच्या पर्यंत पोहचला. प्रियकराने गंमत म्हणून केलेला व्हिडिओ चांगलाच त्याच्या अंगलट आला होता. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. शेवटी हे प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली आणि राहुल (नाव बदललेले आहेत) या दोघांच एकमेकांवर प्रेम होतं. अंजली इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती तर राहुल हा खासगी कंपनीत काम करतो. दोघांचं प्रेम प्रकरण मित्र आणि मैत्रिणीला माहीत होतं. हे प्रेम प्रकरण राहुल च्या घरच्यांना मान्य नव्हतं त्यामुळे राहुल हा वेगळा राहात होता. अंजलीमुळे अनेक वेळा त्याचे घरच्यांशी वाद झाले होते. अंजली आणि राहुलला विवाह करायचा होता. त्यासाठी राहुल हा अंजलीला नेहमी पैसे देत. त्यांनी घराची स्वप्न देखील पाहिलं. मात्र पुढे चालून त्याच्यात वाद होऊ लागले. एके दिवशी त्रयस्थ व्यक्तीने अंजलीला फोटो ठेवून टिक टॉक ऍप वर व्हिडिओ शेर केला. याची तक्रार देण्यासाठी ती पिंपरी-चिंचवड सायबर क्राईम कडे गेली असता. बदनामी केल्याचं अर्ज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला.

त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या देखरेखी खाली केला करण्यात आला. अंजलीचा व्हिडिओ वापरलेले आणखी चार युजर आयडी पोलिसांना मिळाले. परंतु, हे युजर्स आयडी तिच्याच प्रियकराच्या असल्याचे समोर आले. दरम्यान हे सर्व व्हिडिओ इतर दोन मित्रांच्या मोबाईलवरून बनवले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. व्हिडिओ मध्ये अंजली आणि तिच्या पाठीमागून भाऊ येत असल्याचे दिसत असून म्युजिक वाजताच बैल मान हलवतो अश्या प्रकारचा तो व्हिडिओ वायरल करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवल असल्याच सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आपला मोबाईल दुसऱ्याच्या हाती देणं हे देखील चुकीच आहे.