पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ८५२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या २१ हजार ५२० वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या ४२० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १३ हजार १०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक ३३६ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज १७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजच्या आकडेवारीमुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४ हजार २८८ वर पोहचला असून यांपैकी, २,७६५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागातील ही आकडेवारी आहे.