पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २४१ रुग्ण आढळल्याने १ लाख ६० हजार ८६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या ६३९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४९ हजार ९१९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १४४ करोना बाधित रुग्ण आढळले असून १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १६५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ८७ हजार ५१ वर पोहचली असून पैकी ८३ हजार ३७४ जण करोनातुन बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४९ एवढी आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.