डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विक्रम भावेवर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोपा आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित असलेला विक्रम भावे याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. विक्रम भावे याच्यावर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप आहेत. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणं, आरोपींना मार्गदर्शन करणं हे आरोप त्यांच्यावर आहेत. विक्रम भावे हा ठाण्यातील गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. दाभोलकर यांच्याबाबत सगळी माहिती त्याने रेकी करुन हल्लेखोरांना दिली होती. दरम्यान याच विक्रम भावेने जामीन मिळण्यासाठी जो अर्ज केला होता तो पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.