16 February 2019

News Flash

मुळा-मुठेत घातक जीवाणू

घातक जीवाणूंमुळे सर्व रोगांची तीव्रता वाढणे शक्य.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| भक्ती बिसुरे

पुणे शहराची जीवनवाहिनी असलेली मुळा-मुठा नदी दिवसेंदिवस घातक जीवाणूंचे (बॅक्टेरिया) उगमस्थान ठरत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधकांना मुळा-मुठा नदीच्या पाण्यात सुमारे पंचवीस प्रकारचे घातक जीवाणू आढळले असून यातील बहुतेक जीवाणू हे कोणत्याही प्रतिजैविकांना न जुमानणारे (अँटी रेझिस्टंट) आहेत.

२०१६ पासून शहरातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केले असून या संशोधनाला ‘ऑस्ट्रेलिया इंडिया काउन्सिल’चे अर्थसाहाय्य लाभले आहे. संशोधकांच्या संघामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, मॉडर्न महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. विनय कुमार, विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या डॉ. सायली पाटील आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘रॉयल मेलबर्न इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या प्रा. अँड्र बॉल आणि डॉ. रवी शुक्ला यांचा समावेश होता. पर्यावरण शास्त्र आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या संशोधनामध्ये सहभाग घेतला.

डॉ. विनय कुमार म्हणाले, पुणे शहराला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवणारा स्रोत म्हणून मुळा-मुठा नदी ओळखली जाते. २०१६ मध्ये नदीच्या पासष्ट किलोमीटरच्या वहन क्षेत्रामध्ये संशोधन करण्यास सुरवात केली. त्या वेळी नदीच्या उगमाच्या जवळच्या परिसरातील पाणी आणि शहरातील पाणी यांच्या गुणवत्तेमध्ये तफावत

दुष्पपरिणाम

  • घातक जीवाणूंमुळे सर्व रोगांची तीव्रता वाढणे शक्य.
  • त्वचा विकार, श्वसनाचे विकार, मूत्रविकारांचे प्रमाण वाढण्याची भीती.
  • रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन आजार लांबणे शक्य.
  • प्रतिजैविके निकामी ठरत असल्याने तसेच पर्यायी प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने रोगांवर इलाज करणे अवघड.

First Published on September 14, 2018 1:05 am

Web Title: water pollution in pune