पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगांव तसेच लष्कर, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (५ एप्रिल) विद्युत आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (६ एप्रिल) म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

या भागांतील पाणीपुरवठा बंद

* पर्वती जलकेंद्र-

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गांव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

* वडगांव जलकेंद्र-

हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक

* चतु:श्रुंगी, एसएनडीटी, लष्कर – पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, बावधन, चांदणी चौक, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, गणेशनगर, विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगांव, पॉप्युलर नगर, शाहू कॉलनी, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, पुणे स्टेशन, कोरेगांव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ,

मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, वडगांवशेरी, चंदननगर, खराडी, गोंधळेनगर, साततवाडी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

* नवीन होळकर पंपिंग स्टेशन – विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगांव, विमाननगर.