नवीन दत्तक नियमावली अमलात आल्यापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या दीड महिन्यात १०६ बालकांचे दत्तक विधान आदेश केले आहेत. त्यामुळे या अनाथ, सोडून दिलेल्या बालकांना कायदेशीर पालक मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे : डबल डेकर बससाठी पीएमपीची चाचपणी

यापूर्वीची दत्तक विधान आदेश प्रक्रिया ही किचकट होती. यामध्ये बाल कल्याण समितीने बालकाला दत्तकासाठी मुक्त केल्यावर आणि दत्तक समितीने मान्यता दिल्यानंतर संस्था दत्तकसाठीचे अर्ज वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल करायची. न्यायाधीश दत्तकाचे आदेश देत होते. मात्र, केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरणाद्वारे २३ सप्टेंबर २०२२ च्या अधिनसूचनेनुसार नवीन दत्तक नियमावली बनवण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

हेही वाचा- पुणे महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी कारवाई; १ हजार किलो प्लास्टिक जप्त

नवी नियमावली अमलात आल्यानंतर १०६ बालकांचे दत्तकविधान आदेश देण्यात आले आहेत. या दत्तक विधानाची सुरुवात चालू वर्षी १४ नोव्हेंबर या बालदिनाचे औचित्य साधून करण्यात आली. १०६ दत्तक आदेश झालेल्या बालकांपैकी ९० बालके देशांतर्गत दत्तक देण्यात आली आहेत, तर १६ बालके परदेशामध्ये (आंतरदेशीय) दत्तक देण्यात आली आहेत. या दत्तक आदेशामुळे या मुलांना त्यांच्या हक्काचे कायदेशीर पालक आणि हक्काचे कुटुंब मिळाले आहे. मुलाला जन्माने जे अधिकार मिळतात ते सर्व अधिकार आणि विशेषाधिकार दत्तक विधान आदेशामुळे प्राप्त होणार आहेत.

हेही वाचा- पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर विविध उपाययोजना प्रस्तावित

सामूहिक प्रयत्नांमुळे यश

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद, तसेच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त दत्तक संस्था सोफोश, भारतीय समाज सेवा केंद्र, रेणुका महाजन ट्रस्ट, अरुणाश्रय, महिला सेवा मंडळ, आधार दत्तक संस्था आणि पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांच्या एकत्रित प्रयत्नाने सर्वाधिक १०६ दत्तक विधान आदेश दीड महिन्यात पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

हेही वाचा- पुणे : रखडलेले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर जाहीर

प्रक्रिया पुढीलप्रमाणे

ज्या पालकांना मूल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी दत्तक प्रक्रिया अंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी https://cara.nic.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर दत्तक इच्छुक पालकांची गृह भेट, सामाजिक तपासणी, आवश्यक दस्त ऐवजांची पूर्तता झाल्यानंतर ‘कारा’ संकेतस्थळावरून दत्तक नियमावली २०२२ नुसार सर्व दत्तक विधान प्रक्रिया केली जाते. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत छाननी करून ते जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाते. तसेच नाते संबंधातील, सावत्र पालकाचे दत्तक प्रक्रियेचे अर्ज ‘कारा’ संकेतस्थळावर मान्य झाल्यावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केले जातात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 106 orphans got legal guardians in the last one and a half months in pune print news psg 17 dpj
First published on: 29-12-2022 at 22:02 IST