आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपरी पालिकेने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण मतदारसंख्या १४ लाख ८८ हजार ११४ इतकी झाली आहे. रावेतला सर्वाधिक ५२ हजार मतदार असून थेरगावातील बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर प्रभागात सर्वात कमी २२ हजार मतदार आहेत. यापूर्वीच्या प्रारूप मतदार यादीनुसार वाकड प्रभागात सर्वाधिक तर पुनावळे-ताथवडे प्रभागात सर्वांत कमी मतदार होते. पिंपळे सौदागर, मोशी-बोऱ्हाडेवाडी, वाकडची मतदारसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

पिंपरी पालिकेच्या निवडणूक विभागाने शहरातील प्रभागांची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, या मतदारयादीत नाव असेल, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यादीतील दुरुस्त्यांसाठी २३ जून ते १ जुलैपर्यंतची मुदत होती. त्यानंतर, ९ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार होती. सुरुवातीला १६ जुलैपर्यंत आणि नंतर २१ जुलैपर्यंत अंतिम मतदार यादीसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही तांत्रिक कारणे देत यादीचा घोळ सुरू होता. अखेर, महापालिकेने शनिवारी १४ लाख ८८ हजार मतदारांची नावे असणारी अंतिम मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार, आता वाकडऐवजी रावेत-किवळे-मामुर्डी हा सर्वाधिक (५१, ९८९), मतदारसंख्या असणारा प्रभाग ठरला आहे. तर, ताथवडेऐवजी थेरगावातील बापुजीबुवानगर प्रभागाची संख्या सर्वात कमी (२२,४१२) ठरली आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी, वाकड, पिंपळे सौदागर प्रभागाची मतदारसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

lok sabha election 2024 phase 1 of lok sabha polls registers 62.37percent polling despite heatwave
६२.३७ टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा ७ टक्के मतांची घसरण; त्रिपुरात सर्वाधिक
bjp national spokesperson anil baluni chat with indian express
अब की बार २५ लाख पार!; उत्तराखंडसाठी भाजपच्या अनिल बलुनी यांची घोषणा
Pune district has the highest number of voters in the Maharashtra state
राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात 
Unemployment inflation are the important issues trend in CSDS pre election survey
बेरोजगारी, महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे; ‘सीएसडीएस’ निवडणूकपूर्व सर्वेक्षणातील कल

प्रभागनिहाय अंतिम मतदार संख्या –

प्रभाग क्रमांक, प्रभागाचे नाव, मतदार संख्या

१. तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर – ३५,०२२
२. चिखली गावठाण – मोरेवस्ती-कुदळवाडी – ३३,०२४
३. मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी – ४५,९५१
४. मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव – २३,७८२
५. चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी – ३५,३६२
६. दिघी-बोपखेल – ३६,०३४
७. भोसरी सॅण्डविक कॉलनी – २५,४८२
८. भोसरी गावठाण-गवळीनगर- ३४,३८५
९. भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत – ३२,५६१
१०. भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती – ३०,७७४
११. भोसरी, बालाजीनगर-स्पाइन रस्ता – २७,५८९
१२. चिखली, घरकुल-नेवाळेवस्ती – २८,८६०
१३. चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती – ३०,५२८
१४. निगडी, यमुनानगर – २९,३९१
१५. संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर – ३१,९६७
१६. नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर – २८,५३७
१७. संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर – २५,३१०
१८. मोरवाडी-मासूळकर कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी – ३७,६६१
१९. चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर – २९,२३८
२०. काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर – ३३,२४२
२१. आकुर्डी गावठाण-दत्तवाडी – ३५,१२३
२२. निगडी गावठाण-ओटास्किम – २९,६३७
२३. निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी – ३४,४१९
२४. रावेत-किवळे-मामुर्डी – ५१,९८९
२५. वाल्हेकरवाडी – २३,४५५
२६. चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर – ३३,५५९
२७. चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर – ३४,७२०
२८. रामकृष्ण मोरे सभागृह – ३५,८०६
२९. भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंदनगर- ३६,३२३
३०. पिंपरीगाव-वैभवनगर – ३५,७८२
३१. काळेवाडी-विजयनगर-नढेनगर – ३०,१३८
३२. काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर – २६,०७५
३३. रहाटणी-तापकीरनगर – २५,४१०
३४. थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर – २२,४१२
३५. थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर – २४,३६३
३६. थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर- ३०,४५०
३७. ताथवडे-पुनावळे – २४,७५५
३८. वाकड – ४३,७६३
३९. पिंपळेनिलख -३५,८६८
४०. पिंपळेसौदागर- ४०,९५१
४१. पिंपळेगुरव गावठाण-जवळकरनगर – ३२,१९३
४२. कासारवाडी-फुगेवाडी – ३१,६७५
४३. दापोडी – ३८,६६९
४४. पिंपळेगुरव-काशीद नगर- २७,०६७
४५. नवी सांगवी सर्वसाधारण – २९,९९१
४६. जुनी सांगवी – ३८,८४१