Minor Boy Commits Suicide पिंपरी- चिंचवडमध्ये १६ वर्षी अल्पवयीन मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलाने आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. लॉग ऑफ आणि आय क्विट अशा शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की ही आत्महत्या कुठल्या गेम मधून झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. 

हेही वाचा >>> पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसीत एकतर्फी प्रेमातू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी- चिंचवडच्या किवळे भागात २६ जुलै रोजी अवघ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलांनी चौदाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती किवळे पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अल्पवयीन मुलाने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात लॉग ऑफ, आय क्विट, मला सुसाईड नोट लिहिता येत नाही. अशा आशयाचा मजकूर आहे. त्यामुळे ही आत्महत्या कुठल्या गेम खेळण्यातून केली आहे का? या संदर्भात पिंपरी – चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील हे परदेशात असतात. अल्पवयीन मुलगा, आई आणि लहान भाऊ असे तिघेजण किवळे येथील सोसायटीत राहत होते.