चाकणमधील धामणे गावात अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीची हत्या नक्की कोणत्या कारणासाठी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरला मृत मुलगी आईसोबत पाणी आणण्यासाठी शेतामध्ये गेली होती. मात्र, ती शेतातून अचानक बेपत्ता झाली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतातच तिचा मृतदेह आढळून आला. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर याप्रकरणातील अधिक माहिती समजू शकेल, असे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 year old girl found dead in chakan pimpari chinchwad
First published on: 04-12-2017 at 16:02 IST