राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या जाहिराती शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खासगी अनुदानित शाळांतील पदांचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६७८ जागांवर शिक्षक भरती केली जाणार आहे.  

हेही वाचा >>> प्रतीक्षा संपली… शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध! सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये 

शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यमनिहाय जागांमध्ये सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यात मराठीसाठी १८ हजार ३७३, इंग्रजीसाठी ९३१, ऊर्दूसाठी १ हजार ८५०, हिंदीसाठी ४१०, गुजरातीसाठी १२, कन्नडसाठी ८८, तमिळसाठी ८, बंगालीसाठी ४, तर तेलुगूसाठी २ जागा उपलब्ध आहेत.   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीचे बळकटीकरण करण्यासाठी साधन व्यक्ती नियुक्त करण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणे, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.