पुणे शहरात दिवसभरात 202  करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर रुग्णसंख्या 1 लाख 72 हजार 280 इतकी झाली आहे. दरम्यान दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण 4 हजार 502 मृतांची संख्या झाली आहे. त्याच दरम्यान 336 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 1 लाख 62 हजार 779 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 138 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 90 जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 515 वर पोहचली असून पैकी, 89 हजार 747 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 918 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 202 new corona patients in a single day in pune 138 new patients in pimpri abn
First published on: 07-12-2020 at 23:00 IST