तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एकास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी २१ वर्ष सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा >>>पुण्यात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी केला दारू अड्डा उद्धवस्त

सागर अरुण चव्हाण (वय ३३, रा. भोसरी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत बालिकेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात ११ एप्रिल २०१५ रोजी फिर्याद दिली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या खटल्यात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती ॲड. पाठक यांनी युक्तिवादात विशेष न्यायालयात केली होती. या खटल्यात पीडीत बालिकेची साक्ष, आईची साक्ष तसेच वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी चव्हाणला २१ वर्ष सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम नुकसान भरपाई स्वरुपात पीडीत बालिकेच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

हेही वाचा >>>पुणे: मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य, जादुटोणा कायद्यान्वये पतीसह नातेवाईकांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ एप्रिल २०१५ रोजी बालिका घरासमोर खेळत होती. त्या वेळी तिची आई स्वयंपाकघरात काम करत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास बालक घरी रडत आली. तेव्हा आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा चव्हाणने बालिकेवर अत्याचार केल्याचे उघड झाले. बालिकेच्या आईने या घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. आरोपी चव्हाणला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. तरवडे यांनी केला.