पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून चार लाख ७३ हजार रुपयांचा २३ किलो ६६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सूरज कांतीलाल बोरा (वय ३३, रा. सर्वेंद्र कॉम्प्लेक्स, केसनंद फाटा, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बोरा केसनंद फाटा परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून बोराला पकडले. त्याच्याकडून २३ किलो ६६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, रोकडे, मयूर सूर्यवंशी, बोमादंडी, चेतन गायकवाड आदींनी ही कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2022 रोजी प्रकाशित
नगर रस्त्यावर २३ किलो गांजा जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; एकास अटक
नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 13-07-2022 at 17:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 kg cannabis seized on nagar road pune print news zws