पिंपरी: महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात येत आहेत. शिक्षण, कर संकलन, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदीच्या तपासणीचे काम सुरू आहे. वैद्यकीय विभागातील दोन हजार २२२ आणि कर संकलनमधील ११ हजार १८३ कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही.

हेही वाचा… झिकाचा धोका वाढला! पुण्यात सहा संशयित रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा जातीच्या नोंदी तपासण्याचे नव्याने आदेश शासनाने दिले आहेत. त्याचे वर्गीकरण करून तसा स्वतंत्र अहवाल दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.